Ad will apear here
Next
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचा विजय निश्चित - माधव भांडारी

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी पंधरा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले व मतदानाची आकडेवारी तसेच पक्षांतर्गत अहवाल ध्यानात घेता पंधरापैकी नऊ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल व भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडले जातील, असा विश्वास प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

माधव भांडारी यांनी सांगितले की, गुरुवारी मतदान झालेल्या जिल्हा परिषदांपैकी विदर्भातील सर्व पाचही जिल्ह्यात भाजपाची स्थिती चांगली असेल. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल तर गडचिरोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपाला अनुकूल झाले असल्याची पक्षाची खात्री आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळेल अशी खात्री आहे. मराठवाड्यातील ऊर्वरित चार जिल्ह्यात भाजपाच्या जागांमध्ये भरघोस वाढ झालेली दिसेल. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा परिषद भाजपा स्वबळावर जिंकेल असे मतदानावरून दिसते. मतदानाची आकडेवारी पाहता अहमदनगर जिल्ह्यात भाजपाला यावेळी संख्याबळात भरघोस वाढ होण्याची अपेक्षा आहे.

त्यांनी सांगितले की, काल पंधरा जिल्ह्यात सरासरी सत्तर टक्के असे चांगले मतदान झाले. गडचिरोलीमध्ये जनतेने नक्षलवाद्यांच्या दहशतवादाला धुडकावून मतदान केले. ही घडामोड सरकारच्या कामावरील विश्वास दर्शविणारी आहे.
 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HXGCAZ
Similar Posts
मुंबईच्या विकासासाठी भाजपा हाच सक्षम पर्याय! मुंबई शहर सुरक्षित व विकसित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सक्षम पर्याय दिला असून महापालिका निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरूवारी केले.   मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वरळीमध्ये जिजामातानगर येथे भाजपाच्या प्रचारसभेत मा
विशेष महिला जाहीरनामा - माधवी नाईक भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चातर्फे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ''विशेष महिला जाहीरनामा'' मुंबईत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा ॲड.माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते, त्यांचा
शिवसेनेत बंडखोर कार्यकर्त्यांना पदांच्या ऑफर्स; बंड शमविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न! सेनेने बंडखोरांपुढे संघटनेतील पदांचे आमिष ठेवले आहे. पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सेनेने या बंडखोरांपुढे संघटनेतील पदांचे आमिष ठेवले आहे. या बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले असले तरी येत्या
पवारांच्या विधानामुळे सेना – राष्ट्रवादी – काँग्रेस हातमिळवणी उघड - माधव भांडारी भारतीय जनता पार्टीचं सरकार पाडून महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका घ्यायला लावण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. गेले काही आठवडे काँग्रेस पक्ष,   शरद पवार आणि शिवसेना हे तिघेही एकाच सुरात बोलत आहेत. यावरुन त्यांची छुपी हातमिळवणी आता उघडकीस आली आहे, अशी टीका भारतीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language